पैठण, (प्रतिनिधी): शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा गटनेता हसनोद्दीन कट्ट्यारे यांची निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
या समितीने शहराध्यक्षपदी हस्नोद्दीन कट्ट्यारे यांची निवड केली आहे. पक्ष संघटन वाढवण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. सदरील नियुक्तीपत्र काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
शहरातील येथील हसन्नोदिन कट्यारे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठपणाने काम केले व करीत आहेत. तळागाळातील बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या समस्या समजावून त्यांचे निवारण व त्यांच्या हक्क तसेच अधिकाराची लढाई लढलण्यास
अहोरात्र आपला वेळ दिला आहे. अशी जाण असणारे सर्वांच्या परिचयाचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा गटनेते हसन्नोदिन कट्यारे यांची पैठण शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल व पुढील कार्यासाठी काँग्रेस पक्षाचे खा.डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश सचिव रवींद्र काळे, प्रदेश सचिव सय्यद अकरम, प्रदेश सरचिटणीस डॉ. जफर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल, छत्रपती संभाजीनगर शहर शेख युसुफ, जगन्नाथ काळे, प्रदेश उपाध्यक्ष कमाल फारोकी, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, उपाध्यक्ष अंबादास ढवळे, माजी नगरसेवक पाशा भाई मंजन, माजी नगरसेवक इरफान बागवान, माजी नगरसेवक ज्ञानेश घोडके, शेख सलिम, माजीनगरसेवक अतिक अंबेकर, माजी नगरसेवक सईद भाई अंबेकर अदिंनी अभिनंदन केले आहे.